दिसलीस तू, फुलले ऋतू उजळीत आशा, हसलीस तू उरले न आंसू, विरल्या व्यथा ही सुख होऊनीया आलीस तू जाळीत होते मज चांदणे जे ते अमृताचे केलेस तू मौनातूनी ये गाणे दिवाणे त्याचा अनामी स्वरभास तू जन्मात लाभे क्षण एकदा हा ते भाग्य माझे झालीस तू