Lyrics - Hindi Movie Songs
 Marathi Song Index | Movie | Singer | Musician | Lyricist | Play | Forum | Suggest a Song | Email this Page | Guestbook | Hindi
Lyricist :P.Savlaram
Singer :Lata Mangeshkar
Music Director :Vasant Prabhu

गीतकार :पी. सावळाराम
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :वसंत प्रभू



कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला
वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायला

तुम्ही गेला आणिक तुमच्या देवपण नावा आले
सप्त स्वर्ग चालत येता, थोरपण तुमचे कळले
गंगेकाठी घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले
तुम्हाविण शोभा नाही, वैभवाच्या देऊळाला

सूर्यचंद्र तुमचे डोळे, दुरुनीच ते बघतात
कमी नाही आम्हा काही, कृपादृष्टीची बरसात
पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात
पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा
Lyrics Home | Hindi Lyrics | Marathi Lyrics | Lyrics Forum
copyright © 2000-2006 Manjusha Umesh