|
माज्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं, धाकल्या दिरा रं, चल जावया घरा
आज पुनवा सुटलंय दमानं
दरीयाच्या पान्याला आयलंय उधान, पिऊन तुफान वारा
शीड फाटलं धावतं पाठी
तुटलंय सुकानू मोरली काठी
फेसाल पान्याचा घेरा
कोलीवारा रं राहीला दूर
डोलां लोटीला पान्याचा पूर
संबाल संसार सारा | |