|
कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी
प्राण विसावा पैलतिरावरि, अफाट वाही मधी
सुखी मीन हे तरित न गणुनी लाटा कोट्यावधी
सुखी पाखरे गात चालली पार वादळी सुधी
पैलतटि न कां तृण मी झाले? तुडिवता तरी पदीं
पैलतटि न कां कदंब फुलले? किरता माळा कधीं
पापिण खिळले तिरा, विरह हा शस्त्राविण वधीं
प्राणांचे मोल नाविका, लाविं पार ने अधी | |