मोगरा फुलला, मोगरा फुलला फुलें वेचिता बहरु कळियांसी आला इवलेसे रोप लावियेले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी मनाचिये गुंती गुंफियला शेला बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला