|
पैल तो गे काऊ कोकताहे, शकून गे माये सांगताहे
उड उड रे काऊ, तुझे सोनेने मढिवन पाऊ
पाहुणे पंढरी राऊ घरांत येती
दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी
जीवा पढिये तयाची गोडी सांग वेगी
दुधे भरुनी वाटी लावीन तुझें ओठी
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी
आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी
आजिचे रे काळी शकुन सांगे | |