|
जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला
दीन भूकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालूनी
दुःख नेत्रीचे घेता पिऊनी, फोडी पाझर पाषाणाला
घेऊनी पंगू अपूल्या पाठी, आंधळयाची होतो काठी
पायाखाली त्याच्या साठी, देव अंथरी निज हृदयाला
जनसेवेचे बांधून कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून
अर्पून अपुले दृढ सिंहासन, नीत भजतो मानवतेला | |