|
मी मज हरपून बसले गं, सखी मी मज हरपून बसले गं
आज पहाटे श्रीरंगाने, मजला पूरते लूटले गं
साखर झोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले गं
त्या श्वासांनी दीपकळीगत, पळभर मी थरथरले गं
त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर, लाजत उमलत झुलले गं
त्या नभशामल मिठीत नकळत, बिजलीसम लखलखले गं
दिसला मग तो देवकीनंदन, अन मी डोळे मिटले गं | |