|
लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची
सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली
कळी कळी फुलून, ही चढते मंडपी, वेल मायेची
संपताच भातूकली, चिमुकली ती बाहुली
आली वयात खुदूखुदू हसते होऊनी नवरी लग्नाची
हे माहेर, सासर ते, हि काशी रामेश्वर ते
उजळीते कळस दो घरचे चंद्रिका पूर्ण चंद्राची | |