|
लिंबलोणं उतरता अशी का झालीस गं बावरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
हळदीचे तव पाऊल पडता, घरची लक्ष्मी हरखून आता
सोन्याहूनी गं झाली पिवळी, मांडवाला कवळून चढली, चैत्र वेल ही वरी
भयशंकीत का अजूनी डोळे, नको लाजवू सारे कळले
लेकीची मी आहे आई, सासूरवाशीण होऊन मी ही, आले याच घरी
याच घरावरी छाया धरुनी, लोभ दाविते माय पक्षिणी
हसते घर हे तुझ्या दर्शनी, सुखव मला ही आई म्हणोनी, बिलगुनी माझ्या उरी | |