|
पान जागे, फूल जागे, भाव नयनी जागला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला
चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला
स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो
सूर हा, ताल हा, जीव वेडा डोलतो
रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला
लाजरा, बावरा, हा मुखाचा चंद्रमा
अंग का चोरीसी, दो जीवांच्या संगमा
आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला | |