|
कशी करु स्वागता
एकांताचा आरंभ कैसा, असते कशी सांगता
कशी हसू मी कैसे बोलू
किती गतीने कैसी चालू
धीटपणाने मिठी घालू का, कवळू तुजला का
फुलते कळी की, फुलवी वारा
चंद्र हसवी की, हसवी तारा
कुठले आधी, कुठले नंतर, येई ना सांगता
कुणी ना पुढती, कुणी ना पाठी
घरात आहे मीच एकटी
प्रथम दर्शनी बोलायाचा भाव तरी कोणता | |