|
हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का
मिलनाचा परिमल तोची, फूल तेची त्या स्वरुपी
पाकळयांच्या उघडझापी, हास्य उमलले वेगळे का
पावसाळी ग्रीष्मसरीता, सागराला फिरुनी मिळता
जलाशयाची सृष्टी आता, मृगजळे ही व्यापिली का
दूर असता जवळी आले, जवळी येता दूर गेले
जो न माझे दुःख हसले, तोची सुख ही दुखावले का | |