|
हृदयी जागा, तू अनुरागा, प्रीतीला या देशील का ?
बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वगार्चे ते रुप ठेंगणे
शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का ?
दोन मनांची उघडी दारे, आत खेळते वसंत वारे
दीप लोचनी सदैव तू रे, संध्या तारक होशिल का ?
घराभोवती निर्झर नाचे, जाणून आपुल्या गूढ मनाचे
झाकून डोळे एकांताचे, जवळी मजला घेशिल का ? | |