|
मन पिसाट माझे अडले रे, थांब जरासा
मन गान रान गुणगुणले रे
दूरात दिवे मिणमिणले रे
मधुजाल तमाने विणले रे, थांब जरासा
ही खाली हिरवळ ओली
कुजबुजून बोलू बोली
तिमिराची मोजू खोली, थांब जरासा
नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे, थांब जरासा | |