|
धूके दाटलेले उदास उदास
मला वेढीती हे तुझे सर्व भास
उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन फिरे आर्त वारा
कुणी ही ना इथे दिसे आसपास
कुठे चालल्या या दिशाहीन वाटा
कुणा शोधिती या उदासीन लाटा
दिशांतून दाटे, तुझा एक ध्यास
क्षणी भास होतो, तुझे सूर येती
जीवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास | |